Friday, July 29, 2011

मंत्र



अंगात ताप भरणे हा सर्वसामान्य आजार आहे. ताप कोणालाही येऊ शकतो. या आजारात शरीर गरम होते किंवा खूप थंडी वाजते. अन्नावरील वासना उडते. भूक लागत नाही. काही खायला गेलं तर तोंडाला कडवट चव आल्याने जेवण जात नाही. साधारणपण ताप येण्याचे कारण व्हायरल आहे. अर्थात विषाणूमुळे ताप हा आजार होतो. डॉक्टरांकडून उपचार केल्यावर आराम मिळतो. कधी कधी डॉक्टरी इलाजानंतर ताप उतरत नाही. अशा वेळी मंत्र उपचार केल्यास लाभ होतो. या मंत्राचे वर्णन श्रीमदभगवदगीतेत आहे.

तापाने आजारी असलेल्या माणसाने या मंत्राचा थोड्या थोड्या वेळाने जप केल्यास ताप उतरायला मदत होते. आजारी माणसाला जप करायला त्रास होत असेल तर त्याच्या शेजारी बसून कोणीही या मंत्राचा जप करू शकेल.

मंत्र


ओम त्रिशिरस्ते प्रसन्नोस्मि व्येतु ते मज्ज्वराद् भयम।

यो नौ स्मरति सम्वादं तस्य त्वन्न भवेद्भयम् ।।

- श्रीमद्भागवत 


Tuesday, July 5, 2011

PROPERTY चे SIDE EFFECT .......!

PROPERTY चे SIDE EFFECT .......!

वास्तू शास्त्राचा आधार घेऊन खरोखर च घरामध्ये शांती नांदते का?
असा प्रश्न मला एका गृहस्थांनी विचारला, त्यावेळी मला थोडा वेळ उत्तर देण्या पूर्वी थांबावे लागले. कारण विचारणारी व्यक्ती सामान्य नव्हती. सामान्य माणसाच्या  घरात सुख, शांती, साठी पैसा हवा असतो. पण हि व्यक्ती जन्म जात श्रीमंत होती. सर्व प्रकारचे ऐशो आरामाची साधने त्यच्या कडे होती. मी त्याची वास्तू पाहण्या साठी त्याच्या घरी आलो होतो. घरात ते गृहस्थ आणि त्याची पत्नी आणि त्याची २ मुले सह पत्नी राहत होते. पण त्या घरात राहत नव्हती शांतता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मान सन्मान. दिवसाची सुरवात होत असे ती भांडणाने. ज्या वेळी ह्या गृहस्ताने घर घेतले त्यावेळी त्यांनी वास्तू शास्त्र अनुरूप घर घेतले होते. त्या राहत्या घरातही  काही बदल हि  केले होते. त्या घरात नांदत होती फक्त भौतिक स्वरुपाची लक्ष्मी .
घरातील व्यक्तीचे एक मेकावरचे प्रेम वाढण्य पेक्षा कमी कमी होत होते. नाते सबंध फक्त सांगण्या पुरता होता. त्या घरातील एक हि व्यक्ती शांत स्वभावाची नव्हती. राहत्या घरात त्यांना येऊन किमान १६ वर्ष झाली होती.
वरील सर्व इतिहास मी त्या गृहस्था कडून ऐकल होता. मी त्याच्या वरील प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम होते परंतु मी त्याच्या वस्तूचे परीषण करणारा २१ वा वास्तू तज्ञ होतो. हे मला त्यांनी घरात आल्या आल्या सांगितले, त्यातील काही Phd . केलेले नामवंत जे आता बाजारात उच्य पदावर आहेत. त्याचे वर्तमान पत्रात दररोज नाव येते ..... ते ह्या गृहस्तांचे समाधान करू शकले नाहीत. माझा भार वाढला होता कारण  २१ वास्तू तज्ञाचे वजन माझ्यावर होते आणि  मला वास्तू शास्त्राची  मान खाली घालावयाची नव्हती.
 मी हसलो आणि बोललो कि मला प्रथम तुमच्या घरातील सर्व मंडळीची जन्म पत्रिका हवी आहे. ते गृहस्त मला संबोधत " साहेब तुम्ही वास्तू परीक्षणा साठी आलात आणि कुंडली काय मागता आहात त्या वेळी मी त्यांना सांगितले कि हा माझा वास्तू परीक्षणाचा भाग आहे. गृहस्त : तेजस साहेब २० वास्तू तज्ञ येऊन गेले पण त्यांनी काही माझ्या कडे जन्म पत्रिका नाही मागितल्या. मी फक्त हसलो आणि माझ्या कामाला लागलो.
सर्व पत्रिकेचा अभ्यास करता मला असे ध्यानात आले कि ह्या पुरुष मंडळीच्या पत्रिकेत वास्तु दोषाचे  सावट आहे आणि स्त्रियांच्या पत्रिकेत ८ आणि १२ हि स्थाने दुषित आहेत. पण राहते घर तर वास्तू शास्त्रा अनुरूप आहे. त्या गृहस्ताची कुंडली पाहता  पैसा अडका भरपूर आहे. मग घरात अशांतीचे सावट का? त्याला कारणीभूत त्या घरातील स्त्रिया आहेत का? तर पुरुष प्रधान संस्कृती. मी किमान अर्धा तास त्या पत्रीकामध्ये डोके खुपसून बसलो होतो. त्याच वेळी माझ्या डोक्यात दिवा पेटला, आपली अजून काही जमीन जागा आहे का?
कुठे कुठे आहेत ते मला सांगा. ऑफिस कुठे आहे, अजून कुठे राहते घर आहे का? उत्तर होते होय अजून एक राहते घर आहे पण आम्ही तिथे कधीतरी जातो. ते कोणाच्या नावावर आहे. उत्तर होते मी व माझी दोन मुले.माझा प्रश्न ते  घर  घेऊन किती वर्ष झाली ? त्यांचे उत्तर : किमान ११ ते १२ वर्ष. मला माझे उत्तर मिळाले .....!
साहेब आपण त्या घरा संबंधी प्रश्न कुंडली मांडू ? माझे दुसरे घर बाधित आहे का? त्यांना मी १ ते २४९ क्रमांका पैकी कोणताही एक  क्रमांका सांगायला सांगितला, त्यांनी मला ४८ क्रमांक सागितलं त्या अंकातच त्यांचे उत्तर लपले होते ४ (चतुर्थ)  म्हणजे घर आणि ८ (अष्टम) म्हणजे मनस्ताप. पत्रिकेचा परिपूर्ण अभ्यास करता असे कळले कि ती वास्तू बाधित आहे .माझे उत्तर साहेब तुम्ही तुमची ती वास्तू विकून टाकावी.....
त्या दुषित वास्तू मुळे तुम्हाल त्रास होत आहे आणि तुमचे कुटुंब पण त्या मध्ये भरडले जात आहे ... त्या वास्तूचा इतिहास जाऊन घ्या  आणि मग कायतो निर्णय घ्या. ते गृहस्त लगेच आपण त्या वास्तूचे परीक्षण करा आणि दोष काढून टाका .... मी : साहेब या वास्तू तला दोष हा वास्तू चुकीची उभारल्या मुळे नाही आहे . तर तो पंच तत्वा पलीकडील आहे. तुम्ही ती वास्तू विकावी हा माझा सल्ला आहे. माझे वास्तू परीक्षणाचे पैसे मला त्यांनी देले आणि मी तिथून निघालो. किमान ६ महिन्या नंतर त्यांनी ती वास्तू विकली त्या  नंतर दीड वर्षांनी त्याच्या घरात १६ वर्षा पूर्वी गमावलेली मन शांती आणि गृह शांती त्यांना परत मिळाली. त्या  गृहस्थांनी स्वतः मला वरील माहिती सांगितली आणि एक भेटवस्तू पण दिली.... आणि माझे शत शः आभार मानले. 
मित्र हो हा अनुभव मी लिहिण्याचे कारण जी वास्तू  तुम्ही विकत घेता त्याचा इतिहास नक्की जाणून घ्या अन्यथा PROPERTY  चे  SIDE EFFECT ..........तुम्हालाही भोगावे लागतील .  
तेज astrology ..... 9320196969