Monday, November 16, 2009

ज्योतिषशास्त्र टिकेस पात्र का होते.

नमस्कार मित्र हो या भागात आपण पाहणार आहोत ज्योतिषशास्त्र टिकेस पात्र का होते.

           प्रतेक शास्त्राच्या काही मर्यादा असतात. त्या मर्यादांच्या अधीन राहुन त्या शास्त्राचा वापर केल्यास ते शास्त्र उपयुत्क ठरते. अगदी सर्वात अचुक असे जे गणितशास्त्र त्यलादेखील मर्यादा आहेतच,
उदा. ४ वर्गमुळात = ? या प्रश्नची दोन उत्तरे बीजगणित शास्त्रामध्ये दिली जातात. ती म्हणजे +२ किंवा - २ हि होत. अशाच प्रकारच्या मर्यादा प्रत्येक शास्त्रावर आहेत व तशा त्या ज्योतिष शास्त्रालादेखील आहेत. प्रतेक ज्योतिषाने त्या मर्यादांच पालन केले पाहिजे. बहुतेक ज्योतिष्यांना अंतस्फूर्तीची देणगी प्राप्त झालेली असते, मात्र या दैवि देणगीच दुरुपयोग होता कामा नये.
अंतस्फूर्ती हे शास्त्र नव्हे. म्हणून जातकाच्या प्रश्नाला उत्तर देतांना जास्तीत जास्त शास्त्रांच्या नियमानुसार व ज्योतिषशास्त्राच्या मर्यादांच्या अधीन राहुनच देणे आवशक आहे.
       उदा. एखाध्याची चार चाकी गाडी चोरीला गेली , तर ती सापडेल किंवा नाही? केव्हा सापडॆल? कोणत्या अवस्थेत सापडेल? इत्यादी प्रश्नांची उत्तरे ज्योतिषशास्त्रच्या नियमांनुसार अगदी अचुक व तारखेपर्य़त अचुक देता येतात. मात्र एखादा ज्योतिषी वरील सर्व उत्तरे जातकाला अचूक सांगतो आणि पुढे जाउन तुमची गाडी ठाणे चेकनाक्यापासुन १ कि. मी. च्या परिसरात मिळेल असे सांगतो, तेव्हा ज्योतिषाशास्त्राच्या मर्यादांचे उल्लंघन होते. कारन सध्याच्या ज्योतिषशास्त्राच्या कोणत्याही प्रचलित नियमांनुसार गाडी ठाणे शहराच्या चेकनाक्याजळ मिळॆल असे सागंता येणे शक्य नाही. अशी भाकिते चुकल्यास बरोबर आलेल्या भाकितांकडॆ दुर्लष्य करुन जातक चुकलेल्या गोष्टीकडेच अंगुलिनिर्देश करतो.
त्यामुळे ज्योतिषी व शास्त्र दोन्हीही टीकेस पात्र होतात.

No comments: