Wednesday, November 18, 2009

पायरा वास्तुशास्त्र

पायरा वास्तुशास्त्र




नमस्कार मित्र हो आजचा विषय आहे पायरा वास्तुशास्त्र, मनात हा प्रश्न आला असेलच ना? आत हे काय नविन, पायरा वास्तुशास्त्र म्हणजे पिरॅमिड चा वापर करून वास्तुदोष निवारण करणे. पिरॅमिड म्हणजे काय? असा प्रश्न स्वभाविक मना मध्ये आला असेल, पिरॅमिड चा साधा अर्थ म्हणजे पायरा + मिड, पायरा म्हणजे अग्नी, मीड म्हणजे मध्य भाग होय.

गणित विषयाचा सखोल अभ्यास, भुमिती, ज्योतिष विद्या, खगोल शास्त्र, पर्यट्न शास्त्र, स्थापत्य शास्त्र, वास्तुकला शास्त्र इत्यादी गोष्टीचा समन्वय म्हणजे पिरॅमिड निर्मिती होय.

तर मग चला पाहु दैनंदिन जीवनात आपल्याला पिरॅमिड चा कसा उपयोग करता येईल. तर प्रथम घरापासुन सुरुवात करु, आपली मुळ आवश्यकता असते की आपले सुंदर घर असावे. ज्याध्ये सामंज्यस, समृध्दी, स्वास्थ आणि शांती मिळेल.

पिरॅमिड चा उपयोग केल्यामुळे आपण घर आणि वातावरण ह्या मध्ये सामजस्य बनवतो. पायरा वास्तु एक अदभूत कला आहे. ज्या मध्ये आद्न्याब्द पिरॅमिड यंत्राचा वापर करुन आपण आपल्या घरात उत्तम स्वास्थ, प्रसन्नता, समृध्दी प्राप्त करु शकतो. घरातील उर्जा अनुकूल बनवून त्याचा फायदा घेता येतो आणि तो ही तोड फोड न करता.

No comments: