Sunday, May 29, 2011

marriage are made in heaven.

 -/\- नमस्कार  आजचा विषय आहे पत्रिका गुण मिलन आणि ग्रह मेलन यातील फरक  .
आज काल विवाह मंडळानी ज्योतिषाची  कामे हाती घेतली आहेत, ते म्हणजे पत्रिका गुणमिलन
वधू- वरच्या कुंडल्या घ्यायच्या आणि त्याची गुण प्रतीवारी काढून त्यांचे  गुण हे १८ पेक्षा  जास्त आहेतना , तर मग विवाह करण्यास काही हरकत नाही....! असे सरास सांगितली जाते. विवाह मंडळ वाल्यांचे काय विवाह जुळला कि ५०० ते १००० रुपये मिळणार असतात . विवाह झाला  म्हणजे झाले. ते जातकाच्या सुखात सहभागी असतात दु:खत नसतात, दु:खत आठवतो तो ज्योतिषी कारण विवाह वधूवराचे  आयुष्य बदलून टाकते, दोन अनोळखी जीव एकत्र येऊन संसार चालवणार असतात गुण मिलन हे दोन राशीचे मिलन असते तुमच्या कुंडलीतील ग्रहानचे नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे .
  आजच्या शैषणिक युगात चार पुस्तके वाचलेले मुले  मूलतः ज्योतिष हा विषयच मानत नाहीत. मुलगा अथवा मुलगी सुस्वरूप आहे, स्वताचे घर आहे, चांगली नोकरी आहे मग  झाले. पत्रिका पहिली ना गुण १८ च्या वर आहेत ना मग  झालेतर "रिश्ता पक्का समझो" 
वाचक हो जरा थांबा पुढील दिलेले ज्योतिष शास्त्राचे विचार जरा वाचा आणि मग पाउल  पुढे उचला. 

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात हे सत्य असले तरी ज्योतिष शास्त्र न माणारी माणसे पत्रिका पहिल्या शिवाय विवाह जुळवत नाही हे सत्य नाकारता येत नाही .....
शास्त्र करांनी गुणमिलन काढले खरे पण त्याचा वापर करणार्यांनी त्याचा अभ्यास कुठे केला आहे . अर्धवट राव  कार्यकरतात बदनाम होते माझे ज्योतिष शास्त्र. मग  कानावर नेहमी पडणारी वाक्य ..... "माझे तर ३६ पैकी  ३० गुण जमले होते पण काय माझे भाग्यच खोटे, माझे  आणि माझ्या पतीचे जमतच नाही, नेहमी  घरी आले कि भांडणच होते, कोणी मेल्याने पत्रिका जमवली कोण जाने आणि मी हो बोलले ......!" अशी अनेक वाक्य माझा कडे आहेत जी मी माझ्या जातका कडून ऐकतो ...... त्या  वेळेला त्यांची  कीव येते .
मग  मी माझी ज्योतिष  विषया बद्दलची  माहिती त्याच्या  पुढे सादर करतो त्यावेळी त्याच्या डोक्यात उजेड पडतो..... बोलतात आधी भेटला असता तर आज माझी हि अवस्ता  नसती .......!
तर पाहू माझे ज्योतिष  ज्ञान काय सांगते ते ..
प्रथम ज्योतिष शास्त्र  मानत असाल तरच ज्योतिषा कडे जावे , ज्योतिषी गुणमिलन करतो त्यावेळी ग्रह मिलन करतो काते  पाहावे, ग्रह मिलनात खालील मुद्याचा आढावा घ्यावा लागतो
 वैवाहिक सौख्य , संतती सौख्य, कामजीवन, आरोग्य, जीवन मरीयादा, नोकरी / व्यवसाय, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्ठीचा आभ्यास करून ज्योतिषानी  निर्णय द्यावा.पत्रिकेतील चांगल्या वाईट गोष्टीचा आढावा येणाऱ्या त्या जातकाल द्यावा. जेणेकरून सुस्वरूप असलेले स्थळ जातकास लाभदायक आहेका ? त्याचे ज्ञान जातकास द्यावे व निर्णय घेण्यास त्यांनाच सांगावे. कारण ज्योतिषी हा मार्ग दर्शक आहे तो तुमचे भविष्य बदलू शकत नाही. जिन्या वरून पडणार हे जर ज्योतिषाने सांगितले तर तुम्ही पडणार हे निच्छित पण सावध गिरी बाळगली तर मार नक्की कमी लागेल होणा ............. विषय आवडला तर नक्की पर्तिसाद द्या ......!

tejastrology@gmial.com  Mob : 9320196969
                                              // श्री स्वामी समर्थ कृपा //




 

No comments: