Tuesday, May 31, 2011

वधू वराची कुंडली पाहून लग्न करणे कितपत योग्य आहे ?.

वधू वराची कुंडली पाहून लग्न करणे कितपत योग्य आहे ?. आज मला असा प्रश्न  एका देणा बँकेच्या  म्यानेजर ने विचारला. गोपनीयते साठी मी त्याचे नावं लिहित नाही आहे . मी हसलो आणि बोललो का हो आज मला पाहून तुमाला हा प्रश्न का आठवला. ते पण हसले .... प्रश्न विचारण्यास कारण कि माझाही मुलगा लग्नाचा झाला आहे, समोरून प्रपोझल येत आहेत म्हणून विचारावेसे वाटले. मी बोलण्या आधीच त्या च्या मुखातून नेहमी येणारे वाक्य आमचे लग्न झाले तेव्हा  हे असे फ्याड नोहते. आता मुलगा भले ५०००० हजार कमवता आसो पण पत्रिका जुळली नाही तर मुलगी होय सुधा बोलत नाही. मी मनातल्या मनात बोललो   अरे वां......! समाजात ज्योतिष विषयीची जागृती वाढत जात आहे. मी लगेच साहेब तुमच्या मुलाची पत्रिका आहेका ? 
म्यानेजर  साहेब हो आहे ना .!  मी : मला द्या  मी सांगतो तुमच्या मुलाचे लग्नाचे योग कधी आहेत ते. 
म्यानेजर साहेब हि घ्या तेजस साहेब आणि जरा सांगाहो फार टेन्शन आले आहे .पत्रिका के.पी पद्धतीत नव्हती मला माझा इ- नोटबुक काढावे लागले . मुलाची पत्रिका मी पहिली होती दिनांक १५/ ०९/ २०१० रोजी  ०५ :३७ पं. LSRD काढून जन्म वेळ निच्छित करून घेतली .सगळ्या  कुंडलीची पूर्णतः  अभ्यास करून मी माझी माण वर काढली  तर पाहतो तर काय म्यानेजर साहेब चक्क डुलक्या काढत होते. मी मनात बोलो नक्की हा मानव कन्या राशीचा असणार स्वताचे ओझे दुसर्याच्य माथी मारून स्वत अपुल्या डुलक्या मारतो आहे . मी जोरात आवाज करत साहेब .......! हो ..... मी  अहो पत्रिका पहिली, तुमच्या मुलाचे लग्नाचे योग २०१० मध्ये नाहीत तर ते १६/०५/२०११ च्या नंतर आहेत  ह्या वर्षी विवाह होणे अशक्य . ९ महिने वाट पहावी लागेल सून मिळायला ....! मी मस्करीत बोलो . म्यानेजर साहेब :अहो तेजस साहेब अगोदरच उशीर झाला आहे आणि ९ महिने वाट पहावी लागेल . म्यानेजर साहिबना मी बोलो ते  पटले नाही, अहो एक चांगले  स्थळ आले आहे आणि त्यांना मुलीचा विवाह डिसेंबर परियंत करायचा  आहे फक्त पत्रिका जूळलिका लग्न उरकायचे आहे. मुलाला  मुलगी पसंत आहे. मुली वाल्यांनी सागितले आहे कि ३६ पैकी २८ गुण जुळले आहेत पण तुमची पद्धत निराळी आहे ना त्या मुले मी थाबून ठेवले आहे मुली वाल्यांना,  मुलीची पत्रिका पुढे करत. ठीक आहे मुलीची पत्रिका प्रथम दर्शनी पाहताच मी मनातल्या मनात हसलो. मुलीच्या पत्रिकेतील लग्नाचे योग पाहता असे ध्यानात आले कि मुलीचे लग्न  प्रेम विवाह होणार .दशा महादशा पाहता मुलगी प्रेमात आहे हे दिसते . मी म्यानेजर साहेबांना सांगितले  मुलगी प्रेमात आहे कुणाच्या  तरी ....... चौकशी करावी मुलीची. उगाच आपले सुपुत्र बळी पडतील या लफड्या मध्ये.

आठवड्या भाराने मला म्यानेजर साहेबांचा फोन आला कि तुमी जे भविष्य कथन केलात ते अगदी बरोबर आहे 
मुलीचे  तिच्याच कामावर असलेल्या  मुलाबरोबर प्रेम आहे आणि घरातील लोकांना ते मंजूर नाही आहे .त्या मुळे ते लोक घाही करत होते. मग साहेब तुम्ही विचारलेल्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले  का ? साहेब होय .... तुमचा मी आभारी आहे  Thank u very much ...... !  अ रे हो पण आज मी हा  लेख का लिहितो आहे ते मी सांगायचे  विसरून गेलो त्या मुलाचा साखर पुडा ५ जून 2011 ला आहे . कालच त्यांचा  फोन येऊन गेला आग्रहाचे आमंत्रण आहे. मी सागितले ली लग्नाची तारिक १ ६ /०९/२०११  ते  १७ /११/ २०११ च्या दर्माय्न आहे पाहू पुढे काय होत ते .......................



No comments: