Wednesday, June 1, 2011

विज्ञानिक दृष्टी कोनातून भानामती.........

विज्ञानिक दृष्टी कोनातून भानामती......... आज १ जून  अमावास्य आहे आणि शनि  देवाची  जन्म तिथी पण आहे, अमावास्या महीन्याच्य सुरवातीला आल्या मुले जरा आज गूढ शास्त्रावर लिहावेसे वाटले. अमावस म्हटली कि नेहमी गप्पा गोष्टी मध्ये रंगणार विषय म्हणजे भूत पिसाच्य  यांचा. मी स्वतः भाना मतीच्या त्रासातून गेलो नाही पण ज्या लोकांवर हे प्रयोग झाले आहेत त्यांना मी स्वतः भेटलो आहे. भूत -भानामती, चेटूक, जादूटोना, करणी यासारख्या प्रकारांवर स्वतःला विज्ञानवादी म्हणूवून  घेणारे काही लोक विश्वास ठेवत नाहीत. या गोष्टीना ते अंध श्रद्धा समजतात . कारण कोणतीही जड वस्तू बाहेरून भौतिक शक्ती लावल्याशिवाय एक इंचही जागची हलू शकत नाही, असा विज्ञानाचा नियम असल्याचा काही लोक बाहू करतात. माझा तुमाला एक प्रश्न आहे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती कोणी पहिली आहे नाही ना तरी विज्ञान त्याला सत्य मानते कारण त्याचे परिणाम भौतिक गोष्टीवर होतात. अजून उदाहरण द्यायचे झालेतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा चा परिणाम पृथ्वीवर भरती ओहटीच्या रुपात आपणास पहावयास मिळतो. मग भानामती असे काही नसते असे बोलणे पण चुकीचे आहे. भानामती  मानवी मनातूनच निर्माण होते, म्हणजे ती मानवी आत्म्याचेच भौतिक स्वरूपातील बाह्य प्रकटीकरण आहे.
मी तुमाल एक उदहरण देतो तेपण एका वैज्ञानिकाचे  जो नोबेल पारितोषिक विजेता आहे  श्री वूल्फाग्यांग पॉली. हा वैज्ञानिक जेव्हा जेव्हा भौतिक प्रयोगशाळेत प्रवेश करीत असे तेव्हा तेव्हा भौतिक शास्त्रीय प्रयोगाची उपकरणे, मापन यंत्रे मोडून पडत असत अगर फुटत असत याला भौतशास्त्रज्ञ  'पॉली इफेक्ट' म्हणत. आणि महत्वाचे ते म्हणजे पॉली ला भौतिक शास्त्रातील  ज्या Exclusion  तत्वाच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले आहे ते तत्व म्हणजे भौतिकशास्त्रातील एक भानामती आहे ! पण  ती भौतिक तत्वावर आधारित असल्या मुले तीला  भानामती न म्हणता शास्त्रज्ञ ACTION AT DISTANCE  म्हणतात .  

   

1 comment:

Unknown said...
This comment has been removed by the author.