Thursday, November 12, 2009

प्रस्तावना

॥ श्री गणेशाय नम: ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥
 
मी तेजस संभाजी साळसकर आपले स्वागत करतो.


ज्योतिष यावर माझा विश्वास नाही अशी भाष्य करणारे मी भरपूर पाहिले व तीच माणसे पेपर मधली राशीभविष्य वाचतानाही मी पाहिली आहेत, अशी ही मानवाची प्रवृति...

असो, माझ्या ब्लॉग वर मी ज्योतिष विषयाची तुम्हाला माहिती करुन देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला याचा फायदा होईलच हे नक्कि.

ज्योतिषशास्त्राच उगम नेमका केव्हा झाला हे सांगणे कठिण असले, तरी वेद काळा पासून आपल्या भारतीय लोकाना ग्रह्गातिचे आणि ग्रहस्तिथिचे ज्ञान होते असे आढ़ळृंन आले आहे. ज्योतिषशास्त्र हे सर्व शास्त्रतिल प्राचीन असे शास्त्र मानावे लागेल, कारण मानव जातीच्या इतिहासाचा जर आपण शोध घेऊ लागलो तर ज्योतिषशास्त्र अस्तित्वात नाही असा काळच आपल्याला सापडणार नाही. पचावण्ण हजार वर्षापूर्वी ग्रह्नक्षत्राची स्थिथी कशी आहे ह्याचा उल्लेख ऋगवेदात आढळतो. तुमच्या लक्ष्यात आले असेलच की ज्योतिषशास्त्र हे कीती जुने आहे ते.

आपल्याला कुतुबमीनार माहिती असेलच.. सांगा बर तो का बांधला गेला?? नाही माहित??
आकाश निरीक्षण करण्यासाठी, कुतुबमीनार या शब्दाचा अर्थ होतो आकाश अणि ग्रहाचे निरीक्षण.

तात्पुरते येव्ह्ढेच...पुढील भागात पाहु ज्योतिषशास्त्रची व्याख्या..

1 comment:

Unknown said...
This comment has been removed by the author.