Monday, June 27, 2011

A Tej Astrology....: कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण.

A Tej Astrology....: कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण.: "कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण. वाचक हो आपण जे नेहमी जन्म टिपण काढतो तसेच हि पत्रिका आहे पण कृष्ण मूर्ती पद्धती नुसार ह्य..."

कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण.




कृष्णमूर्ती पद्धती नुसार  जन्म पत्रिका टिपण.


वाचक हो आपण जे नेहमी जन्म टिपण काढतो तसेच हि पत्रिका आहे पण कृष्ण मूर्ती पद्धती नुसार
 ह्या पत्रिकेच्या आधारे आपण ज्योतिषा मार्फत आपल्या भविष्यात होणाऱ्या घटनांचे अचूक मार्गदर्शन मिळवू शकता.



* शिक्षण कोणत्या शाखेत घेणे योग्य आहे?
 * नोकरी कि धंदा ?
* नोकरी करताना धंदा करता यईल का?



* माझे स्वतःचे घर कधी होईल?





* मी कार विकत घेऊ शकतोका ?





* माझे प्रेम विवाह होईल का?








* मला संतती होईल का?






*शेअर मार्केट माझ्या साठी लाभदायक होईल का?








* मृत्यू समईची स्तिथी  कशी असेल?  








* कोणत्या देवतेची उपासन मला फलदाई ठरेल?







* माझी राशी कोणती ?माझे नक्षत्र कोणते? माझा गण कोणता? माझी नाडी कोणती ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या पत्रिके द्वारे आपण ज्योतिषा कडून जाणून घेऊ शकता.
tej Astrology... कडून तुम्हाला अंकाशास्त्रातील तुमचा नशीबवान क्रमांक देले जातील आणि ते तुम्हाला 
१०० %  उपयोगी पडतील .
अशी  कृष्णमूर्ती पद्धती नुसार  जन्म पत्रिका टिपण आपल्याला हवी असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा 
          tejastrology@gmail.com and Mob no. 9320196969










 




Saturday, June 18, 2011

ध्यान म्हणजे काय ?


 ध्यान म्हणजे काय ?
 आजचा विषय  आहे "ध्यान" ( Meditation ) माझे स्नेही श्री उपेंद्र सावंत ह्यांनी हा लेख लिहिला  आहे.
ध्यान म्हणजे काय? याची माहिती वाचकान परियंत पोचावी त्यासाठी  आज मी माझ्या ब्लोग वर त्यांचा हा लेख लिहित आहे.
भारताला ध्यानयोग  हि प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली समस्त मानवजातीवर उपकारक ठरणारी एक सुविध्या प्राप्त झाली. आता आधुनिक तंत्र -विज्ञानाच्या युगात देखील  त्याचा आवर्जून  उपयोग केला जातो. तोही विविध मार्गाने, मानवी मनाला शरीराला (Body and mind) संजीवनी देणारी ध्यान हि अदभूतव रहस्यमय  देणगी  आहे. शरीर -मन व आत्मा ह्यामध्ये संतुलित साधण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अध्यात्मिक दृष्ट्या तर ह्याच महत्व फार आहे. 
आता विज्ञानिकाणी संशोधन वरून ध्यानाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासायला सुरवात केली आहे. ह्या अभ्यासांतर्गत सिद्ध झाल आहे कि ध्यानावस्था हि निद्राअवस्थेपेक्षा एका भिन्न अवस्था आहे.
मग, ध्यानात काय अंतर्भूत होत?
ध्यान म्हणजे नेमक काय?
त्याचे उपयोग काय?
त्याचे फायदे काय?
मानव त्यातून व्यक्तिमत्व विकास साधू शकतो का?
त्यातून मनःशांती मिळते, त्याचे मर्म काय?
ध्याना बद्दल गैरसमज आपण पुढे अभ्यासू -
* ध्यान म्हणजे झोप नव्हे .
* ध्यान म्हणजे आळसाने सुस्तावाने असही नाही.
* ध्यान म्हणजे शिथिल कारण  किंवा विश्रांती नाही.
* ध्यान म्हणजे मनाची निर्वात पोकळी!
* ध्यान म्हणजे विचाराची जंजाळातून मुक्तता!  
* ध्यान म्हणजे मानसिक आंदोलने कमी करण्याचे साधन.
* ध्यान म्हणजे असाधारण पवित्र जाणिवेशी आलेला संबंध होय.
* ध्यान म्हणजे नैसर्गिकपने आपण कारण असलेल्या सर्व क्रियांच्या कर्त्या कडे पाहणारी तटस्थ दृष्टी होय.
* ध्यान म्हणजे स्वतःच्या ह्या विश्वातील अदभूत दुनियेतील "स्व " ला ओलाकःण्यासाठी  व गूढरहस्याच्या उलगडा करण्याची गुरुकिल्ली होय.
* ध्यान म्हणजे अंतरंगाची कावड खोलण्यासाठी अंतरंगात डोकावून पाहण्याची अप्रतिम साधन होय.
* ध्यान म्हणजे आत्मतत्वाची कस!
* ध्यान म्हणजे स्व:शक्ती वैश्विक चैतन्यमय शक्तीला जोडणारा दुवा! 

आपल्या तृष्णा, वासना, दुर्भावना, मनोमालिन्य, ताणतणाव,द्वेष,मत्सर,राग, काळजी हे सर्व कचरा ध्यानमार्गाने धुवून काढले जाते. त्यामधून मानवाला वैश्विक शक्तीची जाणीव होऊन जीवाल मानसिक धैर्य प्राप्त होते. ध्याना मुले आंतरिक जागृतता वाढते. शांतता अनुभवने  पण अंतर्गत सावधानता' अशी अवस्था येत. शरीर relax होते. पण मन मात्र काम करत राहत. थोडक्यात हा restful alertness अस म्हणन वावगं होणार नाही. 

तेज astrology.....  9321096969


       


  





Tuesday, June 14, 2011

lecher Antenna & " Quantum pendant"

तेज astrology... 
लेकर एनटीना
नमस्कार  मित्रहो  आज आपण लेकर एनटीना विषयी जाणून घेऊया. हे उपकरण मी वास्तूतील उर्जेचे मापन करण्या साठी वापरतो. आपल्या घरात नीरनिराळ्या प्रकारच्या उर्जा वास्तव्य करतात. त्या धन ऋण उर्जेचे मापना मी या यंत्रा  द्वारे करतो. उदा. घरातील कॉसमीक उर्जा,  जमनी खालील उर्जा, एनटायटी आणि भरपूर काही.

या उपकरणाचा शोध  Mr Ernest Lecher या जर्मन विज्ञानिकाने १८९० च्या सुमारास लावला. त्या वेळी फक्त या उपकरणाचा वापर  Earth magnetic vibration. शोधण्या साठीच होत असे. पुढे Mr Renaurd Cinister   ( १९२५ ) याने या उपकरणाचा वापर मानवी शरीरावरील  व्याधी निर्मुलनासाठी केला. ह्या उपकरणाने तुम्ही तुमचा कोणता अवयव किती टक्के काम करत आहे  हे  जाणून  घेऊ शकता. त्याला उर्जित करू शकता, शरीरातील ७ चक्रांना उर्जित करू शकता. 
मला एका मान्यवर कपंनीने  लेकर एनटीना विषयी जाणून घेण्या साठी बोलावले होते. त्याचे उत्पादन हे शरीरातील उर्जा वाढविण्याच्या संधर्भातील होते. त्या उत्पादनाचे नाव " Quantum pendant" आहे. त्या कंपनी च्या Managing Director मला बोलावणे  धाडले कि  आपण आमच्या कंपनी च्या सिमिणारला यावे आणि आमचे व आमच्या सहकार्याचे मनोबल वाढवावे, हो पण येताना  तुम्ही एकटे न येता तुमचे ते साहित्य घेऊन यायला विसरू नका. करणा  लेकर एनटीना विषयी मी त्याच्याशी त्यांच्या  वास्तू परीक्षांना विषयी काम करताना बोलणे झाले होते. त्याच्या वास्तू मधले दोषही निर्मुलन करून दिले होते. त्यांना पहायचे होते के त्यांचे Quantum Pendant किती उर्जादाई आहेते. आणि सहकार्यांना हि दाखवायचे होते. त्याचे काही छायाचित्र  मी यथे देत आहे .  



तेजस स. साळसकर लेकर एनटीना दाखवताना 

तेजस  स. साळसकर शरीरातील उर्जे चे प्रमाण  % मद्य मापन करताना 

Quantum pendant शरीरावर धारणा केल्या नंतर परीक्षण करताना 

तेजस स. साळसकर एका महिलेचे ७ चक्राचे परीक्षण करताना

Quantum pendant धारण केल्यान नंतर परीक्षण करताना

मान्यवर मंडळी माझे लेक्चर ऐकतान 
" Quantum pendant"


  लिहिण्यात चुका असल्यास शमा असावी  .................!


Wednesday, June 8, 2011

घराचा दरवाजा वास्तू शास्त्रा नुसार कसा सजवावा.

वास्तू शास्त्रा  नुसार घराचा दरवाजा कुठे असावा हे आपण २७/०४/२०११ च्या लेखात  वाचले असेलच पण घराचा दरवाजा आपण वास्तू शास्त्रा नुसार कसा सजवावा आज हे पाहू 
घराचा दरवाजा म्हणजे घराचे मुख.  सुंदर चेहरा पहिला कि मन प्रसंन्न होते आणि ती मुलगी मनात घर करते . मग  सुंदर घराचा मुख्य दरवाजा जर सुंदर सजवलेला  असेल तर घरात लक्ष्मीनिवास करणारच. मग पाहू  माझ्या टिप्स तुम्हाला किती फायदे मंद होतात.

* घराचा  मुख्य  दरवाजा हा घरातील इतर दरवाज्या पेक्षा मोठा असावा. 
* घराची दारे आतल्या बाजुस उघडनारी असावीत.
* दरवाजावर स्वस्तिक, मंगल कलश , शुभ लाभ अशी यंत्रे लावावी.
 दरवाजाच्या बाजुला स्त्री द्वारपाल कोरता येइल मात्र ती  हसवानारे विदूषक आणि सजलेल्या
सुंदर सख्या यांचा सहा असावी.
* दरवाजावर  एक संदल ( दागदागिन्यांचा पेठारा) कोरावी, तिच्यावर शंख, कमल, अशी मंगल नक्षीकाम  कोरलेले असावे. ती अर्धवट उघडी असावी आणि तिच्या मुखातून दागदागिने, रत्न, आभुशने यांचा राशी भरभरून ओसंडताना दिसाव्यत
* दरवाजाच्या डोक्यावर मधोमध कमलावर  बसलेली हाती कमळ धारण केलेली, रत्नाभूषानी भरपूर सजलेली लक्ष्मी कोरावी तिच्या दोन बाजूला तिला स्नान घालत असलेले सुंदर हत्ती कोरावेत. 
* अष्टमंगल यंत्र दरवाजावर लावे.
* आधुनीक  शास्त्र सांगते की घरात प्रवेश करनाऱ्या पृथ्वी, सौर व चंद्र  उर्जेचे संतुलन उंबरठा राखतो. 

to be continue........ 


















Wednesday, June 1, 2011

विज्ञानिक दृष्टी कोनातून भानामती.........

विज्ञानिक दृष्टी कोनातून भानामती......... आज १ जून  अमावास्य आहे आणि शनि  देवाची  जन्म तिथी पण आहे, अमावास्या महीन्याच्य सुरवातीला आल्या मुले जरा आज गूढ शास्त्रावर लिहावेसे वाटले. अमावस म्हटली कि नेहमी गप्पा गोष्टी मध्ये रंगणार विषय म्हणजे भूत पिसाच्य  यांचा. मी स्वतः भाना मतीच्या त्रासातून गेलो नाही पण ज्या लोकांवर हे प्रयोग झाले आहेत त्यांना मी स्वतः भेटलो आहे. भूत -भानामती, चेटूक, जादूटोना, करणी यासारख्या प्रकारांवर स्वतःला विज्ञानवादी म्हणूवून  घेणारे काही लोक विश्वास ठेवत नाहीत. या गोष्टीना ते अंध श्रद्धा समजतात . कारण कोणतीही जड वस्तू बाहेरून भौतिक शक्ती लावल्याशिवाय एक इंचही जागची हलू शकत नाही, असा विज्ञानाचा नियम असल्याचा काही लोक बाहू करतात. माझा तुमाला एक प्रश्न आहे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती कोणी पहिली आहे नाही ना तरी विज्ञान त्याला सत्य मानते कारण त्याचे परिणाम भौतिक गोष्टीवर होतात. अजून उदाहरण द्यायचे झालेतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा चा परिणाम पृथ्वीवर भरती ओहटीच्या रुपात आपणास पहावयास मिळतो. मग भानामती असे काही नसते असे बोलणे पण चुकीचे आहे. भानामती  मानवी मनातूनच निर्माण होते, म्हणजे ती मानवी आत्म्याचेच भौतिक स्वरूपातील बाह्य प्रकटीकरण आहे.
मी तुमाल एक उदहरण देतो तेपण एका वैज्ञानिकाचे  जो नोबेल पारितोषिक विजेता आहे  श्री वूल्फाग्यांग पॉली. हा वैज्ञानिक जेव्हा जेव्हा भौतिक प्रयोगशाळेत प्रवेश करीत असे तेव्हा तेव्हा भौतिक शास्त्रीय प्रयोगाची उपकरणे, मापन यंत्रे मोडून पडत असत अगर फुटत असत याला भौतशास्त्रज्ञ  'पॉली इफेक्ट' म्हणत. आणि महत्वाचे ते म्हणजे पॉली ला भौतिक शास्त्रातील  ज्या Exclusion  तत्वाच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले आहे ते तत्व म्हणजे भौतिकशास्त्रातील एक भानामती आहे ! पण  ती भौतिक तत्वावर आधारित असल्या मुले तीला  भानामती न म्हणता शास्त्रज्ञ ACTION AT DISTANCE  म्हणतात .