Wednesday, January 22, 2014

गुपित वास्तू शास्त्राचे.......!

गुपित वास्तू शास्त्राचे.......!

       गुपित वास्तू शास्त्राचे.......!                                                           
वास्तू शास्त्र हे प्रत्येकाच्या घराघरात पोचले पाहिजे अशी माझे प्रांजळ मत आहे,  पण मला खंत वाटते कि जे वास्तू शास्त्र आज माझ्या देशात घरो घरी  पसरले आहे ते परी पूर्ण नाही. मला येथे  नमूद करावे से वाटते कि वास्तू शास्त्र हे गूढ शास्त्र नाही, हे शास्त्र पूर्णतः वैज्ञानिक शास्त्र आहे. वास्तू शास्त्राचे काही नियम आहेत ते नियम पाळावेच लागतात. नियमांच्या बाहेर जाऊन वास्तू सुख उपभोगणे कठीणच आहे हे अढळ सत्य आहे. जसे विज्ञान हे सिद्धांतावर अवलबून असते तसेच वास्तू शास्त्र देखील सिद्धांतावर आधारित आहे. जेसे  पृथ्वीवरील प्रत्येक पाधार्थ हा जर आकाशाकडे उडविला असता पुन्हा तो खाली येतो त्याला  आपण गुरुत्वाकर्षण असे बोलतो तसेच वास्तू शास्त्र मध्ये सिद्धांताचा उपयोग करणे गरजेचे असते . परंतु जी पुस्तके आज बाजारात विकली जात आहेत त्या मध्ये त्या सिद्धांताचा  उलेख टाळलेला दिसतो किवा त्या पुस्तक लिहिणाऱ्या ला देखील माहिती नसेल कदाचित असे मला वाटते. प्रतेक पुस्तकात प्राथमिक माहिती दिलेली असते आणि मूळ लपून ठेवले जाते .या मागील कारण अजून मला  उमगले नाही. हि  प्राथमिक माहिती वाचून  काही वाचक  आपल्या घरात फेर बदल करायला जातात आणि अपयशास  कारणी भूत ठरतात. बदनाम होते ते वास्तू शास्त्र ......! बाजार मिळणाऱ्या वास्तू शास्त्राची पुस्तके नक्की वाचा पण वास्तू शास्त्र काय आहे ते जाणून घेण्या साठी अंमल करण्या साठी नाही. वास्तू शास्त्र हे ऊर्जेशी निगडीत शास्त्र आहे.  धन आणि ऋण या दोनी उर्जा आपल्या घरला आवश्यक आहेत त्यांचे संतुलन म्हणजेत वास्तू उर्जित करणे होय. हा मूळ सिद्धांत नेहमी लक्षात असुध्या. वरील सिद्धांत जरी एका ओळीचा असाल तरी त्यात पूर्णतः वास्तू शास्त्राचे मूळ गुपित लपले आहे.

No comments: