Wednesday, January 22, 2014

वास्तू शास्त्र बद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती

वास्तू शास्त्र बद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती

पृथ्वीतलावर कुठेही आकृती, रूप , कुठलेही सीमा असलेले निर्मिती होते , त्या मध्ये  निरनिराळ्या नियंत्रण करणाऱ्या उर्जा तयार होतात त्या उर्जेला वैदिक परिभाषेमध्ये देव बोलतात. देव याचा अर्थ असा होतो, स्वयं
प्रकाशमान उर्जा  बिंदू अथवा शक्ती केंद्र. त्या उर्जा  समूहाला  आपण वास्तू मंडळ असे बोलतो.
वास्तू मध्ये ज्या ४५ देवदा आहेत ते आपल्या उर्जेच्या शक्ती प्रमाणे कार्य करायला सुरवात करतात. ह्या उर्ज्या समूहामध्ये काही धन उर्जा तर  काही ऋण उर्जा असलेले देवता आहेत. त्या धन ऋण उर्जेचा आपण कसा आपल्या जीवना मध्ये फायदा करून घ्यावा याचा अभ्यास वास्तू शास्त्र शिकवते.

उदारणार्थ : उत्तर दिशा हि कुबेराची दिशा आहे  ती  दिशा आपल्याला काय देते दर धन. वास्तू मंडळा मध्ये ह्या  दिशेला भल्लाट  आणि सोम ह्या देवता येतात . भाल्लाट हि देवता समृद्धी देते तर सोम हि देवता संसार मध्ये सर्व प्रकारची धन प्राप्ती देणारी अधिष्ठ देवता आहे. ( धन उर्जा असलेली देवता )

अन्गेय दिशेला भृश  हि देवता येते. हि मंथन करणारी देवता आहे. वास्तू मध्ये ह्या स्थांनी  पूर्वी लोणी काढले जात असे. सध्याच्या  काळात ह्या ठिकाणी आपला मिक्सर ठेवलेला उत्तम परंतु जर ह्या ठिकाणी आपले शयन कक्ष असेल तर ते तापदायक ठरेल. सतत निगेटिव विचार येतील घेतलेले निर्णय चुकतील,  चिंता वाढेल.
( ऋण उर्जा असलेली देवता )

अशा ह्या ४५ देवतांचा  अभ्यास वास्तू तज्ञांना असतो. त्या अभ्यासा  नुसार ते आपल्या घराची रचना करतात.
आणि आपल्याला त्या वास्तूतील  उर्जेचा फायदा करून देतात

No comments: